सकाळच्या नाश्त्यासाठी पोहे हा अनेकांचा आवडता आणि झटपट तयार होणारा पदार्थ आहे. पोहे बनवताना त्यात कांदा, बटाटा, हिरवे वटाणे टाकले जातात. काहीजण त्यात लिंबाचा रसही टाकतात. मात्र पोह्यांमध्ये लिंबू नेमका कधी टाकावा, असा प्रश्न अनेकांना पडतो.
लिंबू कधी टाकावा?
पोहे बनवून झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर वरून लिंबाचा रस टाकणे ही सर्वात योग्य पद्धत आहे. गॅस बंद केल्यानंतर वरून लिंबू पिळल्यास पोह्यांना छान आंबट चव येते.
शिजताना लिंबू टाकल्यास चव बदलते
अनेकजण पोहे वाफेवर परतून घेताना लिंबाचा रस टाकतात. मात्र पोहे शिजताना लिंबाचा रस टाकल्यास त्यांची चव बदलू शकते. त्यामुळे पोहे पूर्ण तयार झाल्यानंतरच वरून लिंबू टाकावा, हेच योग्य मानले जाते.
Leave a Reply