देशाच्या साक्षरतेच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. केंद्र सरकारच्या उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी साक्षरतेचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे देशाचा साक्षरता दर ८१.१ टक्क्यांवर पोहोचला आहे.
९५ टक्के म्हणजे पूर्ण साक्षर
एखाद्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात साक्षरतेचे प्रमाण ९५ टक्क्यांवर पोहोचले की तो प्रदेश पूर्ण साक्षर मानला जातो. या निकषावर ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश पूर्ण साक्षर घोषित झाली आहेत. २०११ च्या जनगणनेत देशाचा साक्षरता दर ७४.०४ टक्के होता. त्या तुलनेत आताचा ८१.१ टक्के हा दर मोठी प्रगती दर्शवतो.
प्रौढांसाठीचा उल्लास कार्यक्रम
उल्लास म्हणजे नवभारत साक्षरता कार्यक्रम. शालेय शिक्षणापासून वंचित राहिलेल्या १५ वर्षांवरील प्रौढांसाठी हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रम राबवला जातो. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० शी तो जोडलेला आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट २०२२ ते २०२७ या काळात पाच कोटी शिकणाऱ्यांपर्यंत पोहोचणे हे आहे.
Leave a Reply