पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात प्रस्तावित वीज प्रकल्पावरून वाद निर्माण झाला आहे. कर्जतप्रमाणे येथेही मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होण्याची भीती व्यक्त होत आहे. या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असून, भाजप नेते संग्राम थोपटे यांनीही या विरोधात भूमिका घेतली आहे.
मानवी साखळी आंदोलन
आज या प्रकल्पाच्या विरोधात मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिला आणि लहान मुलांसह हजारो पुरुष सहभागी झाले. हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. हा वीज प्रकल्प रद्द व्हावा, हीच आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.
झाडांच्या कत्तलीची भीती
प्रकल्पामुळे परिसरातील झाडे तोडली जातील, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. आंदोलकांनी प्रकल्प रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे.
Leave a Reply