बहुतेक जण पिकलेली पपई खातात, पण कच्ची पपईही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. कच्च्या पपईत व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यात पॅपेन नावाचे एंझाइम आणि अँटीऑक्सिडंट्सही असतात. त्यामुळे कच्ची पपई आहारात घेतल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
पचन आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर
कच्च्या पपईमुळे पचनक्रिया चांगली होते. गॅस, पोटफुगी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या तक्रारी कमी करण्यास ती मदत करू शकते. पॅपेन एंझाइम पचन सुधारण्यासोबतच शरीरातील सूज कमी करण्यासही उपयुक्त ठरू शकते. अँटीऑक्सिडंट्स शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून रक्षण करतात, तर कच्ची पपई खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते.
त्वचा, केस, वजन आणि शुगर नियंत्रण
कच्च्या पपईतील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा तेजस्वी होण्यास आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होऊ शकते. ती नियमित खाल्ल्याने केस मजबूत होतात आणि त्यांची वाढही वेगाने होते, असे मानले जाते. कच्च्या पपईमुळे शरीरातील सूज कमी होते, संधिवातात आराम मिळतो आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. पोट जास्त वेळ भरलेले राहिल्याने जास्त खाणे टाळले जाते, त्यामुळे वजन कमी करण्यासही ती उपयुक्त ठरू शकते. तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होत असल्याने मधुमेह असलेल्या लोकांसाठीही कच्ची पपई फायदेशीर मानली जाते.
कच्ची पपई कशी खावी?
कच्ची पपई सॅलडच्या रूपात खाता येते. तिचा पराठा, भाजी, रस किंवा लोणचेही करता येते. त्यामुळे पपई पिकण्याची वाट न पाहता कच्ची पपई आहारात घेऊन फरक अनुभवता येईल.
Leave a Reply