न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या एका निर्णयाची जोरदार चर्चा रंगली आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवून प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली. मात्र, प्रसिद्ध कृष्णाला या संधीचे सोने करता आले नाही.
100 धावा खर्च, सर्वात महागडा गोलंदाज
पहिल्या डावात प्रसिद्ध कृष्णाने तब्बल 100 धावा खर्च केल्याने तो भारताचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याच्या महागड्या गोलंदाजीमुळे संघाला मोठा फटका बसला.
निवडीवर प्रश्नांचा भडिमार
सिराजला डावलून प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्याचा निर्णय टीम इंडियाला चांगलाच महागात पडला का, असा सवाल उपस्थित होत आहे. संघ व्यवस्थापनाच्या या निवडीवर आता क्रिकेट चाहत्यांकडूनही प्रश्नांचा भडिमार होत आहे आणि सिराजची आठवण काढली जात आहे.
Leave a Reply