शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

कोल्हापुरात अंत्यसंस्कार मोफत; ऋषिकेश जोशी यांचे विधान

कोल्हापुरात व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी एकही रुपया मोजावा लागत नाही, असे अभिनेते ऋषिकेश जोशी यांनी मुलाखतीत सांगितले. हा नियम आजही पाळला जातो.

कोल्हापुरात अंत्यसंस्कार मोफत; ऋषिकेश जोशी यांचे विधान

मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेते ऋषिकेश जोशी यांनी फक्त मराठीच नाही, तर हिंदी सिनेविश्वातही स्वतःची ओळख भक्कम केली आहे. मालिका, सिनेमे आणि नाटकांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. ‘हरिशचंद्राची फॅक्ट्री’, ‘येलो’, ‘आजचा दिवस माझा’, ‘देऊळ’ आणि ‘विष्णुपंत दामले: द अनसंग हीरो ऑफ टॉकीज’ यांसारख्या सिनेमांमधील त्यांच्या दमदार भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत. दरम्यान, एका मुलाखतीत जोशी यांनी कोल्हापूरबद्दल मोठे विधान केले आहे.

मृत्यू कोल्हापुरातच झाला पाहिजे

‘जन्माला कोल्हापूरमध्ये नाही आलात तरी चालेल, पण मृत्यू कोल्हापुरातच झाला पाहिजे’, असे ऋषिकेश जोशी म्हणाले. त्यांच्या मते, जगामध्ये कोल्हापूर हे असे एकमेव शहर आहे, जिथे कुठल्याही माणसाने कुठेही जन्म घ्यावा, पण त्याने मरावे कोल्हापुरात. कारण कोल्हापूरमध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, तर अंत्यविधीसाठी एक रुपयाही खर्च येत नाही. महाराजांनी त्यावेळी गॅझेटमध्ये याबाबतचे बील पास केले होते आणि आजही महानगरपालिका सक्तीने हा नियम पाळते. गेलेल्या माणसाच्या क्रियाकर्माचे पैसे घ्यायचे नाहीत, ही फार मोठी गोष्ट आहे.

अंत्यविधीचा सर्व खर्च महानगरपालिका करते

ही गोष्ट फक्त विनोदापर्यंत मर्यादित नाही, यामागे दुरोगामी विचार आहेत, असेही जोशी म्हणाले. अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे आणि इतर व्यवस्था पाहण्यासाठी शहर संपन्न आहे. स्मशानातही पैसे लागत नाहीत, असे त्यांनी सांगितले. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोल्हापूर शहरात कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्मशानभूमींद्वारे अंत्यसंस्काराची व्यवस्था केली जाते. यामध्ये पंचगंगा स्मशानभूमीसह कसबा बावडा, कदमवाडी आणि बापट कॅम्प येथील स्मशानभूमींचा समावेश आहे. दररोज सुमारे १० ते १५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात, असे सांगितले जाते. मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारा सर्व खर्च कोल्हापूर महानगरपालिका करते.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance