राज्यात गोवंशाच्या संरक्षणासाठी सरकारने आणखी एक कडक पाऊल उचलले आहे. गायींची कत्तलीसाठी खरेदी करणाऱ्यांविरोधात आता थेट मोक्का लावण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही मोठी घोषणा केली आहे.
गोशाळांच्या जमिनीबाबतही महत्त्वाचा निर्णय
यापूर्वी गोशाळांसाठी जमीन खरेदीची नोंदणी कृषी दरानेच होणार, असा निर्णय सरकारने घेतला होता. त्या निर्णयानंतर आता गोवंशाची कत्तल रोखण्यासाठी सरकार आणखी आक्रमक झाले आहे. कत्तलीसाठी गायींची खरेदी करणाऱ्या व्यक्तींविरोधात मोठी कारवाई करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
कत्तल करणाऱ्यांवर थेट मोक्का
गोवंशाची कत्तल करणाऱ्यांविरोधात थेट मोक्का अंतर्गत कारवाई होणार आहे. या निर्णयामुळे गोवंशाची अवैध कत्तल आणि त्यासाठी होणारी खरेदी रोखण्यास मदत होईल, असा सरकारचा विश्वास आहे. राज्य सरकारने गोवंश संरक्षणाच्या दिशेने घेतलेले हे धडाडीचे पाऊल मानले जात आहे.
Leave a Reply