आकाशाकडे पाहिलं की कधी पांढरे शुभ्र ढग दिसतात, तर कधी काळेभोर ढग दिसतात. पण ढग पांढरे आणि काळ्याच रंगाचे का दिसतात, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? यामागे एक सोपे विज्ञान आहे.
ढगांची निर्मिती कशी होते?
ढग हे लाखो सूक्ष्म पाण्याचे थेंब आणि बर्फाच्या लहान कणांपासून तयार झालेले असतात. सूर्यप्रकाशातील वेगवेगळ्या रंगांचे किरण ढगांमधून विखुरले जातात आणि त्यामुळे ढगांना त्यांचा रंग मिळतो.
पांढरे ढग का दिसतात?
बारीक ढग सूर्याच्या किरणांना चारही दिशांमध्ये पसरवण्याचे काम करतात. त्यामुळे ते पांढऱ्या आणि चमकदार रंगाचे दिसतात. ढग पांढरे किंवा काळे दिसणे हे सूर्यप्रकाश ढगांमधून कसा विखुरला जातो, यावर अवलंबून असते.
Leave a Reply