चंद्रावर गेल्यावर खायचे काय आणि प्यायचे काय, हा अंतराळवीरांसमोरील मोठा प्रश्न आहे. मात्र आता या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी चंद्रावर असलेल्या मातीसारख्या नमुन्यांमध्ये बटाट्याचे पीक यशस्वीरीत्या घेतले आहे. नासाने केलेल्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे.
चंद्राच्या मातीत बटाटा कसा उगवला?
शास्त्रज्ञांनी चंद्राच्या पृष्ठभागावरील मातीसारखे नमुने तयार करून त्यामध्ये बटाट्याची लागवड केली. या प्रयोगात बटाट्याचे पीक यशस्वीपणे आले. चंद्रावरही अन्नधान्य पिकवता येऊ शकते, हे या संशोधनातून समोर आले आहे.
अंतराळवीरांना याचा फायदा काय?
या संशोधनाचा मुख्य उद्देश म्हणजे चंद्रावर जाणाऱ्या अंतराळवीरांना भविष्यात अन्न शोधण्याची कोणतीही अडचण भासू नये. तसेच पृथ्वीवरून अन्न घेऊन जाण्याची गरज कमी व्हावी. भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी आणि तेथे दीर्घकाळ राहण्यासाठी हे संशोधन मोठे पाऊल मानले जात आहे.
Leave a Reply