राज्यात 5 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र वेतन नियम 2026 लागू झाला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लाखो नोकरदारांचे वेतन सुरक्षित राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्या नियमांनुसार किमान वेतन, कामाचे तास, साप्ताहिक सुट्टी, अनियमित वेतन, वेतन कपात आणि वेतनाची नोंद ठेवण्याबाबत एकसमान कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
कामाचे तास आणि साप्ताहिक सुट्टी
नव्या वेतन नियमांनुसार दररोज आठ तास आणि आठवड्यात 48 तास कामाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. साप्ताहिक सुट्टी बंधनकारक करण्यात आली असून सुट्टीच्या दिवशी काम केल्यास बदली सुट्टी आणि दुप्पट पगार देण्याची तरतूद आहे. महागाई भत्त्यात वर्षातून दोन वेळा सुधारणा होणार आहे.
वेतनाबाबत एकसमान कार्यपद्धती
किमान वेतनापासून ते वेतनाच्या नोंदीपर्यंत सर्व बाबींसाठी एकसमान कार्यपद्धती ठरवण्यात आली आहे. यामुळे नोकरदारांच्या वेतनासंबंधीच्या तक्रारी कमी होण्याची आणि वेतनाबाबत पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे. नव्या नियमांमुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
Leave a Reply