पुण्यातील साळुंखे विहार परिसरात राहणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचे निधन झाले आहे. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. त्यांच्या निधनामुळे लष्करी क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
गच्चीवर गेले असता घडली घटना
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक जोशी हे बुधवारी सकाळी उन्हात बसण्यासाठी राहत्या इमारतीच्या गच्चीवर गेले होते. त्या वेळी त्यांना चक्कर आली आणि ते गच्चीवरून खाली पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
लष्करी क्षेत्रात हळहळ
अशोक जोशी यांनी भारतीय लष्करात महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या निधनाची बातमी समजताच लष्करी क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. पुण्यातील साळुंखे विहार परिसरातील एका निवासी इमारतीत ते राहत होते.
Leave a Reply