खासदार संजय राऊत यांनी एसआरए घोटाळ्यावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मर्जीतील बिल्डरांना वाचवत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, ४० हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
चौकशी थांबवण्याचा दबाव?
या प्रकरणाची चौकशी थांबवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचा दबाव असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणावरून राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
राजीनाम्याचा दावा
पुढचा पुरावा समोर येताच मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल, असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
Leave a Reply