क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. सचिन तेंडुलकर यांच्या 35 वर्षांच्या क्रिकेट प्रवासातील 25 ऐतिहासिक बॅट्स आणि त्यांच्या वैयक्तिक स्मृतिचिन्हांचे बॅटोग्राफी दालन सुरू करण्यात आले आहे.
हे दालन वानखेडे स्टेडियमवरील एमसीए संग्रहालयात उभारण्यात आले आहे. येथे सचिनच्या पहिल्या बॅटपासून ते अखेरच्या कसोटी सामन्यात वापरलेल्या बॅटपर्यंतचा प्रवास पाहता येणार आहे.
क्रिकेट इतिहासाचा ठेवा
सचिन तेंडुलकर यांची 35 वर्षांची क्रिकेट कारकीर्द भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्णपर्व मानली जाते. त्यांच्या या प्रवासातील महत्त्वाच्या बॅट्स एकाच ठिकाणी पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे.
या दालनात ठेवण्यात आलेली प्रत्येक बॅट सचिनच्या कारकीर्दीतील एका महत्त्वाच्या टप्प्याची साक्ष देते. वानखेडे स्टेडियमला भेट देणाऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी हे दालन आता एक आकर्षण ठरणार आहे.
Leave a Reply