सातारा जिल्ह्यातील कारखान्यांनी कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे ऊस दर जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर कारखान्याबाहेर आंदोलन करण्यात आले.
आश्वासन देऊनही फसवणूक केल्याचा आरोप
कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे ऊस दर जाहीर करण्याचे आश्वासन देऊनही सातारा जिल्ह्यातील कारखानदारांनी ऊस दराबाबत फसवणूक केल्याचा आरोप राजू शेळके यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेने कारखान्याबाहेर चक्काजाम आंदोलन सुरू केले.
चक्काजाम आंदोलन; ऊस वाहतूक रोखली
आंदोलनादरम्यान ऊस वाहतूक रोखून धरण्यात आली आहे. कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे ऊस दर जाहीर करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
Leave a Reply