लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील दहा मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान, काँग्रेस नेते तथा माजी आमदार धीरज देशमुख यांनी लातूर येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
सहकार पॅनेलला बहुमताचा विश्वास
काँग्रेस महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलच्या बाजूने नेहमीप्रमाणे मतदारांचा कौल राहील, असा विश्वास धीरज देशमुख यांनी व्यक्त केला. सहकार पॅनेल बहुमताने निवडून येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील दहा मतदान केंद्रांवर मतदान पार पडले असून, या निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा ·अमळनेरात बळीराजाच्या जयघोषात भव्य मिरवणूक
Leave a Reply