शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

पुतळ्यांची कामे वेळेत पूर्ण करा; महापौरांचे निर्देश

छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉ. आंबेडकर, संभाजीराजे व अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश महापौर समीर राजूरकर यांनी दिले आहेत.

पुतळ्यांची कामे वेळेत पूर्ण करा; महापौरांचे निर्देश

छत्रपती संभाजीनगरमध्ये भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तसेच टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजीराजे व अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यांचे काम ठरविलेल्या माइलस्टोननुसार सुरू आहे का, याचा आढावा दोन दिवसांत आयुक्तांनी घ्यावा, असे निर्देश महापौर समीर राजूरकर यांनी शुक्रवारी, १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिले.

नगरसेवक अमित भुईगळ यांच्यासह नगरसेवकांनी यासंदर्भात विषय उपस्थित केला होता. सात डिसेंबरपूर्वी डॉ. आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी भुईगळ यांनी केली. सार्वजनिक बांधकाम विभागावर विसंबून न राहता महापालिकेने स्वतः लक्ष घालून पुतळ्यांची कामे पूर्ण करून घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली. त्यावर महापौरांनी यासंदर्भात वारंवार बैठका घेऊन आढावा घेतला. त्यात माइलस्टोन ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार कामे होत आहेत किंवा नाही, याचा आढावा दोन दिवसांत आयुक्तांनी घ्यावा, असे निर्देश दिले.

२० नोव्हेंबरपूर्वी पुतळा आणण्याचे आश्वासन

यासंदर्भात खुलासा करताना शहर अभियंता संजय कोंबडे यांनी सांगितले, की सिव्हिलचे काम ९५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. पुतळ्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे. त्यावर महापौरांनी फक्त पुतळ्याचे काम महापालिकेमार्फत सुरू आहे. त्यानुसार २० नोव्हेंबरपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तिथे आणण्यात येईल, असे आश्वासन दिले.

स्रोत: मूळ बातमी

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance