राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक फोटो समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोवर वेट अँड वॉच 3.0 असा मजकूर लिहिण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर 3.0 राबवले जाणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
सहा खासदारांचा प्रवेश
काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला होता. ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी गटाची साथ सोडून मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी दुसरा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. या प्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या खासदारांची संख्या वाढली असून, राज्यात महायुतीमध्ये आता सर्वाधिक खासदार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतरचे चित्र
लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते, तर महायुतीला मोठा धक्का बसला होता. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे 9 खासदार निवडून आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे 6 खासदार फोडले. दरम्यान, आता एकनाथ शिंदे यांचा आणखी एक फोटो व्हायरल झाला असून, त्यावरून ऑपरेशन टायगर 3 राबवले जाणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply