सणासुदीला एकमेकांना मिठाई देण्याची परंपरा आजही कायम आहे. मात्र, काळानुसार भेटवस्तू देण्याच्या पद्धतीत मोठा बदल होताना दिसत आहे. आता लोक केवळ मिठाई किंवा चॉकलेट देण्याऐवजी आरोग्याची काळजी घेणाऱ्या वस्तू, वैयक्तिक हॅम्पर्स आणि खास अनुभव देण्याकडे वळत आहेत. भेटवस्तू देण्याची ही नवी पद्धत हळूहळू लोकप्रिय होत आहे.
अनुभवांची भेट
भेटवस्तू देण्याचा हा एक नवा प्रकार आहे. यामध्ये जवळच्या व्यक्तीला नेहमीची वस्तू देण्याऐवजी एखादा खास अनुभव दिला जातो. स्पा सेशन, स्वयंपाकाचे कार्यशाळा, चित्रकलेचा वर्ग, योगा सेशन किंवा आवडत्या ठिकाणी जेवणाचा अनुभव भेट म्हणून देता येतो. अशा अनुभवांच्या आठवणी दीर्घकाळ मनात राहतात, त्यामुळे अशा भेटींना वाढती पसंती मिळत आहे.
वैयक्तिक भेटवस्तूंची पसंती
आता बाजारातून कोणतेही सामान्य गिफ्ट खरेदी करण्याऐवजी लोक समोरच्या व्यक्तीची आवड लक्षात घेऊन वस्तू निवडतात. एखाद्याला पुस्तकांची आवड असेल तर त्याला पुस्तकांचा हॅम्पर, बागकामाची आवड असेल तर रोपांचे किट, तर फिटनेसची आवड असणाऱ्यांना फिटनेस साहित्य देता येते. याशिवाय वैयक्तिक फोटो फ्रेम, खास जर्नल आणि जुन्या आठवणींशी संबंधित भेटवस्तूही लोकप्रिय होत आहेत.
हेल्दी फूड हॅम्परमध्ये सुकामेवा, बिया आणि हर्बल चहा यांचा समावेश करता येतो. वेलनेस गिफ्ट बॉक्समध्ये अरोमा डिफ्यूझर, आरामासाठीचे किट आणि स्वतःची काळजी घेण्याशी संबंधित उत्पादने ठेवता येतात. हिरव्या भेटवस्तूंमध्ये घरातील रोपे, हर्ब गार्डन किट आणि छोट्या कुंड्या देता येतात. पुस्तकांच्या हॅम्परसोबत वाचनासाठीचा दिवा किंवा वैयक्तिक बुकमार्क देता येईल. स्पा, चित्रकला कार्यशाळा, स्वयंपाक वर्ग किंवा जेवणाचा अनुभव देणारे व्हाउचरही चांगला पर्याय ठरू शकतो. योगा मॅट आणि रेसिस्टन्स बँड यांसारख्या फिटनेस भेटवस्तूही देता येतात, तर फोटो अल्बम आणि खास कॅलेंडर यांसारख्या वैयक्तिक भेटी आठवणी जपतात.
भेट निवडताना लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी
भेटवस्तू महागडी असणे आवश्यक नाही, तर ती उपयोगी आणि समोरच्या व्यक्तीच्या आवडीनुसार असणे अधिक महत्त्वाचे आहे. हेल्दी फूड हॅम्पर देताना त्यातील पदार्थांची गुणवत्ता आणि वापरण्याची मुदत तपासून घ्यावी. त्याचप्रमाणे त्वचेची काळजी किंवा वेलनेसशी संबंधित उत्पादने निवडताना त्या व्यक्तीची गरज आणि आवड लक्षात घेणे आवश्यक आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply