भाऊबीज हा भाऊ-बहीण यांच्यातील प्रेम, जिव्हाळा आणि विश्वासाचे नाते अधिक घट्ट करणारा सण आहे. या दिवशी बहीण भावाला औक्षण करून त्याच्या सुखी आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊही बहिणीला खास गिफ्ट देऊन तिचा आनंद द्विगुणित करतो. या दिवशी बहिण भावाला रुमाल, नॅपकीन आणि नारळ देण्याची परंपरा आहे. मात्र, काळानुसार यात बदल झाला असून आता बहीणसुद्धा भावाला वेगवेगळी गिफ्ट देते. तुम्ही अजूनही भावासाठी गिफ्ट घेतले नसेल आणि काय घ्यावे हा प्रश्न पडला असेल, तर खालील पर्याय नक्की पाहा. हे गिफ्ट भावाच्या उपयोगी पडतील.
उपयोगी आणि स्टायलिश पर्याय
भावाला स्टायलिश वस्तू वापरण्याची आवड असेल, तर त्याच्यासाठी सुंदर घड्याळ निवडू शकता. त्याच्या आवडीनुसार क्लासिक अॅनालॉग घड्याळ किंवा स्मार्टवॉच हा चांगला पर्याय ठरू शकतो. रोजच्या वापरात येणारी ही वस्तू त्याला नक्की आवडेल. परफ्यूम हादेखील कोणत्याही प्रसंगासाठी चांगला गिफ्ट पर्याय आहे. भावाला आवडणारा फ्रेश, वुडी किंवा सौम्य सुगंध असलेला परफ्यूम निवडू शकता. गिफ्ट पॅकमधील परफ्यूम सेटही छान दिसतो. भावाला फॅशनची आवड असेल, तर त्याच्यासाठी शर्ट, टी-शर्ट, हुडी किंवा जॅकेट खरेदी करू शकता. कपडे निवडताना त्याची आवड, साइज आणि रंगांची पसंती लक्षात घ्या. भावाला गाणी ऐकण्याची, गेम खेळण्याची किंवा ऑनलाइन काम करण्याची आवड असेल, तर वायरलेस ईअरबड्स किंवा हेडफोन गिफ्ट करू शकता. खरेदी करताना बॅटरी बॅकअप, साउंड क्वालिटी आणि वापरण्यास आरामदायक आहेत का, हे तपासा.
आवडीनुसार खास निवड
भावाला व्यायाम आणि फिटनेसची आवड असेल, तर त्याच्यासाठी फिटनेस बँड किंवा जिममध्ये उपयोगी पडणाऱ्या वस्तू निवडू शकता. यामुळे त्याच्या आवडीला प्रोत्साहनही मिळेल. रोजच्या वापरासाठी उपयोगी पडणारे वॉलेट हादेखील चांगला पर्याय आहे. भावासाठी त्याच्या आवडीनुसार आकर्षक डिझाइन आणि चांगल्या दर्जाचे वॉलेट निवडू शकता. कमी बजेटमध्येही असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भावाला काहीतरी वेगळे द्यायचे असेल, तर त्याच्यासाठी पर्सनलाइज्ड गिफ्ट निवडा. त्याच्या नावाची किंवा फोटोची खास आठवण जपणारी वस्तू देऊ शकता. यात रोज वापरता येईल असे मग किंवा किचेनमधील वस्तू असे पर्याय निवडू शकता. अशा गिफ्टमुळे भाऊबीजेचा आनंद आणखी खास होईल.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply