वैदिक पंचांगानुसार आज मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. आज दिवाळी पाडवा असल्याने हा दिवस अत्यंत खास मानला जात आहे. हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. आज ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा असून ग्रहांचा दुर्मिळ संयोगही जुळत आहे. त्याचा परिणाम सर्व १२ राशींवर दिसून येईल.
आजचे राशीभविष्य
मेष: आज भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य द्या. थोडी मानसिक अस्वस्थता जाणवली तरी ती तुमच्या फायद्याची ठरेल.
वृषभ: आज महिला संततीबाबत समाधान मिळेल. तुमच्या बौद्धिक क्षमतेला वाव देणारं ग्रहमान आहे.
मिथुन: आज तुमच्या स्वभावातील गुण जवळच्या लोकांच्या लक्षात येतील. तुमचं कौतुक झाल्याने तुम्ही सुखावून जाल.
कर्क: आज कुटुंबातील लोक तुमचं कौतुक करतील. तुम्ही इतरांसाठी खूप काम कराल.
सिंह: आज मित्र-मैत्रिणींच्या समूहात रमून जाल. सहलीचं नियोजन कराल आणि मानसिक दुर्बलता दूर होईल.
कन्या: आज इतरांकडून तुमच्या अपेक्षा वाढतील. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे ओढा राहील.
तूळ: आज स्त्रियांच्या मदतीने अडलेली कामं करून घेतल्यास ती लवकर पूर्ण होतील. कलाकारांना त्यांच्या कलेला वाव मिळेल.
वृश्चिक: आज कमी कष्टात आर्थिक लाभ होईल. विद्यार्थ्यांनी इतर गोष्टींकडे लक्ष थोडं कमी द्यावं.
धनु: आज राग आणि अविचारीपणावर ताबा ठेवावा. प्रकृतीच्या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं लागेल.
मकर: आज पथ्यपाणी सांभाळणं आणि औषधोपचार वेळेवर करणं गरजेचं आहे. घरातील मोठ्या माणसांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.
कुंभ: आज तुमच्या आचारविचारात स्वतंत्र विचारांना थारा द्याल. अनपेक्षितपणे एखादा खर्च उद्भवून पैसे खर्च होतील.
मीन: आज बुद्धीला व्यवहाराची जोड मिळून योग्य निर्णय घ्याल. महिला बोलण्यात मागे हटणार नाहीत.
लक्षात ठेवण्यासारखं
वरील माहिती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार वर्तवलेले हे अंदाज आहेत; याबाबत कोणताही दावा केला जात नाही.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply