बॉलिवूड, टीव्ही आणि वेबसिरीजमध्ये काम करणारी अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. तिने इन्स्टाग्रामवर काही नवे फोटो शेअर केले आहेत. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी तिने हे फोटो पोस्ट केले आहेत.
लाल साडीतील खास लूक
या फोटोंमध्ये श्वेताने लाल रंगाची डिझायनर साडी परिधान केली आहे. त्यावर तिने तितकाच सुंदर ब्लाऊज पेअर केला आहे. तिचा मिनिमल मेकअप आणि ज्वेलरीची निवडही परफेक्ट झाली आहे. दिवाळीचा उत्साह सर्वत्र दिसत असताना श्वेताने तिचे सेलिब्रेशन चाहत्यांबरोबर शेअर केले आहे.
‘Happy beautiful Diwali to all of you’ असे कॅप्शन देत तिने दिव्याचे इमोजीही जोडले आहेत. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनीही तिला रिप्लाय देत शुभेच्छा दिल्या आहेत.
फिटनेस आणि कारकीर्द
श्वेता आता ४६ वर्षांची आहे. मात्र तिचा फिटनेस सर्वात भारी आहे. तिने स्वतःला एवढे मेंटेन करून ठेवले आहे की, तिचे वय ऐकल्यावर अनेकांना आश्चर्य वाटते.
श्वेताने टीव्हीच्या छोट्या पडद्यावरून कारकीर्दीची सुरुवात केली होती. आता तिने सिनेमे आणि वेबसिरीजमध्येही स्वतःला सिद्ध केले आहे. अनेक जाहिरातींमध्येही ती झळकली आहे. तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply