मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

शंभूराज देसाईंची माणमध्ये शेतकऱ्यांसोबत दिवाळी

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माण तालुक्यात शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. मंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघातील या भेटीमुळे राजकीय चर्चा सुरू झाली.

शंभूराज देसाईंची माणमध्ये शेतकऱ्यांसोबत दिवाळी

सातारा जिल्ह्यात महायुतीत तणातणी सुरू असतानाच एक लक्षवेधी घडामोड समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माण तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. विशेष म्हणजे त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याच विधानसभा मतदारसंघात जाऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत घोंगड्यावर बसून फराळ केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत.

जिल्ह्यातील सत्तासंघर्षाची पार्श्वभूमी

राज्यातील महायुती सरकारमध्ये सातारा जिल्ह्यातील भाजपचे दोन आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक मंत्री आहे. महायुती असताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी मोठा सत्ता संघर्ष झाला होता. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीने युती केली होती, तर भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. निकालात शिवसेना आणि राष्ट्रवादीला भाजपपेक्षा अधिक जागा मिळाल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आणण्याचे स्वप्न धुळीला मिळाले होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांना पोलिसांनीच धक्काबुक्की आणि मारहाण केली होती. त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला होता.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे चित्र

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपला 9, राष्ट्रवादी काँग्रेसला 8 आणि शिवसेनेला 4 जागा मिळाल्या. एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे संख्याबळ नाही. तरीही भाजपचे मंत्री जयकुमार गोरे हे जिल्हा बँकेचा अध्यक्ष भाजपचाच होणार असल्याचे ठामपणे सांगत आहेत. या सर्व घडामोडी ताज्या असताना दिवाळीच्या निमित्ताने पालकमंत्र्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या माण तालुक्यात जाऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधी शिवसेनेत प्रवेश केलेले आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले त्यांचे सख्खे बंधू शेखर गोरे हे पालकमंत्र्यांसोबत होते. त्यामुळे महायुतीत सर्व काही अलबेल नाही, याची प्रचिती येते. जिल्हा बँकेचा अध्यक्ष कुणाचा होणार, याची उत्सुकता ताणली असून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे देखील ‘न्यूट्रल’ भूमिकेत असल्याचे सांगितले जात आहे.

स्रोत: मूळ बातमी

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance