प्रत्येकाच्या घरात खुर्च्या असतात. अनेकांकडे प्लास्टिकच्या तर काहींकडे लाकडी किंवा लोखंडाच्या खुर्च्या असतात. प्लास्टिकच्या खुर्च्या लवकर मळतात. त्यांच्यावर धूळ जमा होते आणि त्यामुळे पांढऱ्या खुर्च्या काळसर दिसू लागतात. सूर्यप्रकाश, धूळ आणि घाण यामुळे खुर्च्या काही दिवसांतच पिवळसर किंवा काळसर दिसू लागतात.
खुर्च्यांवरील हट्टी डाग लवकर निघत नाहीत. मात्र घरातील साध्या वस्तूंचा वापर केल्यास खुर्च्यांची चमक परत मिळवता येते. त्यासाठी कोणतेही केमिकल रसायन वापरण्याची गरज नाही. स्वयंपाकघरातील वस्तूंनी खुर्च्या अगदी नव्या आणल्यासारख्या चमकवता येतात.
हट्टी आणि पिवळे डाग कसे घालवावेत
खुर्चीवर हट्टी डाग असतील तर बेकिंग सोडा वापरता येतो. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात बेकिंग सोडा मिसळावा. त्यानंतर ओल्या कापडाने खुर्चीचा खराब झालेला भाग पुसावा किंवा घासावा. साधारण १० ते १५ मिनिटे तसेच ठेवावे आणि मग हलक्या हाताने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे.
खुर्चीवर पिवळे डाग असतील तर लिंबू आणि मिठाचा वापर करून पाहावा. अर्ध्या लिंबावर थोडे मीठ लावून ते खुर्चीवरील पिवळ्या डागावर लावावे. साधारण १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्यावे आणि मग स्वच्छ पाण्याने धुवावे.
खुर्ची धुळीने खराब झाली असेल तर डिटर्जंट आणि कोमट पाण्याने ती स्वच्छ करता येते. एका बादलीत कोमट पाण्यात डिटर्जंट मिसळावे आणि मऊ कापड बुडवून खुर्चीवर घासावे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवावे. खुर्ची सुकवण्यासाठी तिला उन्हात ठेवू नये.
खुर्ची स्वच्छ करताना काय टाळावे
खुर्ची स्वच्छ करण्यासाठी कडक तारेचा ब्रश वापरणे टाळावे. त्यामुळे प्लास्टिकच्या खुर्चीवर बारीक ओरखडे पडू शकतात आणि त्यावर नंतर धूळ व घाण अधिक सहजपणे जमा होते. स्वच्छतेसाठी मऊ स्पंज, कापड किंवा मऊ ब्रश वापरावा. त्याचप्रमाणे केमिकल रसायने किंवा ब्लीचचा वारंवार वापर करणेही टाळावे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply