भारतात चहा पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवात गरमागरम चहा प्यायल्याने होते. चहा प्यायल्याने शरीरातील थकवा कमी होतो आणि मूड फ्रेश राहण्यास मदत होते.
## योग्य वेळ का महत्त्वाची?
चहा योग्य वेळी पिणे हे देखील आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. तुम्ही जर चुकीच्या वेळी चहा पित असाल तर ती सवय बदलणे महत्त्वाचे आहे. सकाळ, दुपार की संध्याकाळ — चहा पिण्याची वेळ शरीरावर परिणाम करते.
## रिकाम्या पोटी चहा प्यावा का?
अनेकांना सकाळी रिकाम्यापोटी चहा पिण्याची सवय असते. चहामध्ये कॅफिन असते, त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने आरोग्यावर परिणाम होतो. काहीही न खाता रिकाम्यापोटी चहाचे सेवन केले तर छातीत जळजळ यांसारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply