रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

बागेला जास्त पाणी दिलं तर घरात साप येऊ शकतो; घ्या ही काळजी

घरापुढील बागेत झाडांना प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिले तर जमिनीत गारवा वाढतो आणि साप तिथे वास्तव्य करून घरात येऊ शकतो. बागेची योग्य काळजी कशी घ्यावी, ते वाचा.

बागेला जास्त पाणी दिलं तर घरात साप येऊ शकतो; घ्या ही काळजी

प्रत्येकाला आपले घर ऐसपैस असावे असे वाटते. छानसे घर आणि त्या घरापुढे छोटीशी बाग, हे तर प्रत्येकाचेच स्वप्न असते. घरापुढे बाग लावण्यासाठी अनेकजण बरीच मेहनत घेतात. काही महिन्यांत किंवा वर्षभरात झाडे मोठी होतात आणि बगीचा फुलतो. परंतु घरापुढे बहरलेला हाच बगीचा नंतर तुमची डोकेदुखी वाढवू शकतो. याच बगीच्यामुळे घरातील एखादा सदस्य संकटात सापडू शकतो.

बाग आणि साप यांचा संबंध

साप हा असा प्राणी आहे, जो कोणताही आवाज न करता तुमच्या घरात शिरतो. सापाला अडचण आवडते. जिथे अडचण आणि अडगळ असते, तिथे साप हमखास असतोच. हिरवळ, दाट झाडी आणि जंगलातही साप सापडतात. म्हणूनच तुमच्या घरापुढे बाग असेल, बागेत झाडे असतील आणि हिरवळ असेल, तर साप या बागेत येऊ शकतो. वास्तव्य करण्यासाठी बाग हे सापाचे आवडीचे ठिकाण आहे.

तुमची ही एक चूक ठरू शकते घातक

घरापुढची बाग चांगली वाढावी यासाठी आपण लावलेल्या झाडांना भरभरून पाणी देतो. गवताला, फुलझाडांना आणि छोट्या रोपट्यांना जास्त पाणी दिले की ते लवकर वाढतील, अशी आपली धारणा असते. ते काही अंशी खरेही आहे. झाडांना वाढण्यासाठी पाण्याची गरज असते. परंतु बागेत प्रमाणापेक्षा जास्त पाणी देत राहिले तर जमिनीमधील गारवा वाढतो. सापाला गारवा आवडतो. जिथे थंड जागा दिसेल, तिथे साप वास्तव्य करतो. म्हणूनच तुम्ही बागेला जास्त पाणी दिले तर गारव्यामुळे साप तिथे राहायला येऊ शकतो. त्यामुळे झाडांना आवश्यक तेवढेच पाणी द्यावे.

घरात साप येऊ नये म्हणून काय करावे

सापांना गारवा आवडतो, त्यामुळे घरातील इतरही गारव्याच्या ठिकाणी साप आपले वास्तव्य करू शकतात. त्यामुळे घरातील गारव्याची ठिकाणे ओळखून साप तिथे येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. झाडांची कुंडी, झाडांचे खोड, गवत आणि पालापाचोळा अशा ठिकाणीही साप राहतात. त्यामुळे बागेत नियमित सफाई करावी. झाडांना आवश्यक तेवढेच पाणी देणे आणि बाग स्वच्छ ठेवणे, यामुळे घरात साप येण्याची शक्यता कमी होते.

स्रोत: मूळ बातमी

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance