राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. दरम्यान, शरद पवार यांना रुग्णालयातून डिसचार्ज मिळाल्यानंतर त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी घडामोडींना वेग आला आहे.
प्रफुल्ल पटेल यांची भेट
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
सिल्व्हर ओकवर नेत्यांची गर्दी
शरद पवार यांना रुग्णालयातून डिसचार्ज मिळाल्यानंतर ते आपल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आले आहेत. ते निवासस्थानी दाखल होताच घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार गटाचे बडे नेते सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. पार्थ पवारही शरद पवार यांना भेटण्यासाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. या घडामोडींविषयी अधिक माहिती येत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply