कार, बाईक किंवा स्कूटर घेतल्यानंतर त्याचा विमा काढणे गरजेचे असते. आता या वाहन विम्याच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. भारतीय विमा नियामक संस्थेने वाहन विम्यासाठी नवीन चार प्रकारचे नियम लागू केले आहेत. हे नियम १५ डिसेंबर २०२६ पासून लागू होणार आहेत. नवीन नियमानुसार वाहन मालकांना त्यांच्या गरजेनुसार विमा निवडता येणार आहे. म्हणजेच कोणता विमा घ्यायचा आणि कोणत्या सुविधांसाठी पैसे भरायचे हे ग्राहक स्वतः ठरवू शकतील. यामुळे विमा घेताना ग्राहकांना अधिक सोयीस्कर होणार आहे.
## वाहन विम्याचे चार प्रकार कोणते?
नवीन नियमानुसार वाहन विम्याचे चार भाग करण्यात आले आहेत.
पहिला प्रकार म्हणजे थर्ड पार्टी विमा. हा विमा घेणे अनिवार्य असेल. तुमच्या वाहनामुळे दुसऱ्या व्यक्तीला, तिच्या वाहनाला किंवा मालमत्तेला नुकसान झाले तर त्याची भरपाई या विम्यातून मिळते.
दुसरा प्रकार म्हणजे लीगल लायबिलिटी कव्हर. या विम्यामुळे कारमध्ये बसलेल्या प्रवाशांना किंवा दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीला अपघात झाल्यास वाहन मालकाची कायदेशीर जबाबदारी कव्हर होते.
तिसरा प्रकार म्हणजे पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर. वाहन मालकाला अपघात झाल्यास आर्थिक मदत मिळण्यासाठी हे कव्हर असते. याबाबतचे सध्याचे नियमच पाळावे लागतील.
चौथा प्रकार म्हणजे ओन डॅमेज कव्हर. तुमच्या स्वतःच्या वाहनाचा अपघात झाला, गाडीला आग लागली किंवा गाडी चोरीला गेली तर या विम्यामुळे नुकसान भरून काढण्यास मदत होते.
## कोणता विमा घेणे बंधनकारक असेल?
नवीन नियमानुसार थर्ड पार्टी विमा घेणे अनिवार्य असेल. इतर विमा पर्याय ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार निवडता येतील. मात्र वाहन मालकांसाठी असलेले पर्सनल ॲक्सिडेंट कव्हरसाठी सध्याचे नियम पाळावे लागतील.
आता विमा काढताना ग्राहकांना एक नवीन फॉर्म दिला जाणार आहे. याला कस्टमर ऑप्शन फॉर्म असे म्हणतात. या फॉर्ममध्ये ग्राहकांना कोणत्या प्रकारचा विमा हवा आहे हे निवडता येईल. तसेच विमा कंपन्यांना कस्टमर इन्फॉर्मेशन शीट द्यावी लागेल. यामध्ये कोणत्या विम्यासाठी किती पैसे भरावे लागतील आणि त्यातून कोणते फायदे मिळतील याची माहिती दिली जाईल.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply