ऐन दिवाळीच्या तोंडावर जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. एकाच दिवसात दोन वेळा दर वाढल्यामुळे सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांची चिंता वाढली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी शुभ मानली जात असल्याने अनेकांचा कल सोने खरेदीकडे असतो, मात्र दरवाढीमुळे खरेदीदारांना आता दहावेळा विचार करावा लागत आहे.
एका तासात सोन्यात आणखी ७०० रुपयांची वाढ
सकाळी सोन्याच्या दरात २ हजार ५०० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर अवघ्या एका तासात पुन्हा सोन्याच्या दरात ७०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे ४ नोव्हेंबर रोजी १० ग्रॅम सोन्याचा भाव जीएसटीसह १ लाख ४५ हजार ४३६ रुपयांवर पोहोचला आहे.
चांदीही महागली, किलोचा भाव १,९५,७०० रुपये
चांदीच्या दरातही दिवसभरात दोनदा वाढ झाली. सकाळी चांदीच्या दरात ६ हजार रुपयांची वाढ झाली होती, तर त्यानंतर एका तासात पुन्हा ४ हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे एक किलो चांदीचा भाव जीएसटीसह १ लाख ९५ हजार ७०० रुपयांवर पोहोचला आहे. सलग दोन वेळा झालेल्या या दरवाढीमुळे सणासुदीच्या काळात सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर आर्थिक भार वाढला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply