बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

रेल्वे वेटिंग, खासगी बसेसचे भाडे २० ते ५० टक्क्यांनी वाढले

दिवाळी सुट्यांत रेल्वे आरक्षण संपल्याने भार खासगी बसेसवर पडला; खासगी ट्रॅव्हल्सने भाडे २० ते ५० टक्क्यांनी वाढवले, तर एसटीने हंगामी भाडेवाढ रद्द केली.

रेल्वे वेटिंग, खासगी बसेसचे भाडे २० ते ५० टक्क्यांनी वाढले

इंधनाचे वाढलेले दर, महागाईचा भडका आणि सणाच्या हंगामात मागणी वाढल्याने खासगी ट्रॅव्हल्सने प्रवासी तिकिटांचे दर वाढवले आहेत. एसटी महामंडळाने यंदा हंगामी भाडेवाढ केलेली नसल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र रेल्वे प्रवासासाठी मोठी प्रतीक्षा यादी आणि विमानसेवेची महाग तिकिटे यामुळे दिवाळीच्या सुट्यांमध्ये पर्यटकांना खिसा हलका करावा लागत आहे.

दिवाळीच्या सणानिमित्त शाळा आणि महाविद्यालयांना सुट्या असून, मोठ्या वीकेंडमुळे शासकीय व खासगी आस्थापनांनाही पाच ते सात दिवस सुट्या आहेत. त्यामुळे नागरिकांचा ओघ पर्यटनाकडे दिसत आहे आणि अनेक जण सण साजरा करण्यासाठी मूळ गावाकडे जात आहेत. गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढताच वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. रेल्वेचे आरक्षण महिनाभरापूर्वीच पूर्ण झाल्याने प्रवाशांचा भार खासगी बसेस आणि विमानांवर पडत आहे.

खासगी बसेसचे भाडे २० ते ५० टक्क्यांनी वाढले

याचाच फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी नेहमीच्या दरांपेक्षा २० ते ५० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ केली आहे. पुणे, धुळे, छत्रपती संभाजीनगर या वर्दळीच्या मार्गांसह मुंबई व इतर शहरांसाठी गाड्या उपलब्ध केल्या आहेत, मात्र या प्रवासासाठी नियमित तिकीट दरांच्या तुलनेत २० ते ५० टक्के जास्त रक्कम आकारली जात आहे. दुसरीकडे, सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने प्रस्तावित १५ टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करत हजारो अतिरिक्त बसेस रस्त्यावर उतरवल्या आहेत.

भाड्याची कारही परवडेनाशी

सहकुटुंब पर्यटनाचा आनंद घेताना अनेक जण थेट भाडेतत्त्वावर गाडी बुक करतात. परंतु इंधनदरवाढीमुळे विना एसी १० ते १२ रुपये, तर एसी सुविधेसह १५ ते १७ रुपये प्रति किलोमीटर या दराने भाडे आकारले जात असल्याने कार भाडेतत्त्वावर घेणेही परवडत नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे.

स्रोत: मूळ बातमी

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance