येवला शहरात दिवाळीचे औचित्य साधून मध्यवर्ती भागात आकर्षक आणि भव्य आकाश कंदील उभारण्यात आला आहे. शहरातील धडपड मंच या स्वयंसेवी संस्थेने हा कंदील लावला असून तो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
वीस वर्षांची परंपरा
व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या नियोजनाखाली गेल्या २० वर्षांपासून धडपड मंचच्या वतीने शहरातील मेनरोडवर हा आकाश कंदील लावला जातो. दिवाळी म्हटले की दिव्यांचा प्रकाश, रंगबिरंगी पणत्या आणि आकाशकंदील यांनी घरे उजळून निघतात; त्याचबरोबर शहराचे सौंदर्यही वाढावे, हा यामागील हेतू आहे.
कमी ऊर्जा खाणारे दिवे
कंदील उजळवण्यासाठी अत्याधुनिक पण कमी ऊर्जा खाणाऱ्या दिव्यांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी हा कंदील अतिशय विलोभनीय दिसतो. या कार्यात मयूर पारवे, दत्ता कोटमे, मुकेश लचके, गोपी दाणी, शुभम सुकासे आणि सुभाष निकम यांनी सहकार्य केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply