समाज काय म्हणेल, हे वाक्य आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाने कधी ना कधी ऐकलेलेच असते. जेव्हा एखादी व्यक्ती प्रवाहाविरुद्ध जाऊन आपली इच्छा व्यक्त करते आणि घरातील ज्येष्ठांना ती गोष्ट मान्य नसते, तेव्हा हमखास हाच प्रश्न विचारला जातो. त्यानंतर काय उत्तर द्यायचे, हेच अनेकदा कळत नाही आणि आपण शांत बसतो.
मात्र एका आजीने याच प्रश्नाचे असे उत्तर दिले आहे की, समाजाचे तुणतुणे वाजवणाऱ्या मंडळींची बोलतीच बंद झाली आहे. त्यांनी उलट प्रश्न विचारला आहे की, ज्या समाजासाठी तुम्ही आपल्या मुलांच्या स्वप्नांचा भंग करत आहात, तो समाज म्हातारपणी तुमच्या औषधोपचाराच्या वेळी कुठे असतो?
मुलांच्या स्वप्नांपेक्षा समाज मोठा का?
अनेक घरांमध्ये मुलांनी एखादे वेगळे स्वप्न पाहिले की, समाज काय म्हणेल या भीतीपोटी ते स्वप्न दाबले जाते. पालकांना मुलांच्या भवितव्यापेक्षा समाजाच्या मताची जास्त काळजी वाटते. मात्र या आजीने हाच मुद्दा उलटवून धरला आहे. समाजाच्या भीतीपोटी मुलांची स्वप्ने मोडणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
व्हिडीओला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद
या आजीचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर पाहिला जात असून त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यशस्वी होण्यासाठी प्रत्येक घरात अशी आजी हवी, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. समाजाच्या दबावापेक्षा मुलांच्या स्वप्नांना प्राधान्य द्यावे, हा संदेश या व्हिडीओतून मिळतो, असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply