महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. ऑक्टोबर महिना संपला तरी लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा झालेले नाहीत, त्यामुळे लाभार्थी महिला चिंतेत आहेत.
ऑक्टोबर संपला तरी हप्ता नाही
या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होतील, असे सांगितले जात होते. मात्र ३१ तारीख आली तरी पैसे आले नाहीत. त्यामुळे सप्टेंबरचा हप्ता नेमका कधी मिळणार, असा प्रश्न लाभार्थी महिलांना पडला आहे.
आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याकडे लक्ष
सप्टेंबरच्या हप्त्याबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सप्टेंबरचा १५०० रुपयांचा हप्ता पुढच्या आठवड्यात, म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांचे लक्ष आता पुढील आठवड्याकडे लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply