बॉलिवूडमधील सेलिब्रिटींचे खासगी आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय असते. सध्या ज्या व्यक्तीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ते दुसरे तिसरे कोणी नाहीत, तर करण जोहर यांचे काका आय. एस. जोहर आहेत. त्यांच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या की त्या ऐकून मोठा धक्का बसतो. त्यांच्या भावानेच त्यांची प्रेयसी पळवली होती, अशीही एक घटना त्यांच्या आयुष्यात घडली होती.
आय. एस. जोहर उच्चशिक्षित होते. त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांत पदव्युत्तर पदवी मिळवली होती, तसेच एलएलबीचे शिक्षणही पूर्ण केले होते. करण जोहर यांचे वडील यश जोहर हे त्यांचे मोठे भाऊ होते. याशिवाय त्यांना एक जुळा भाऊही होता. आय. एस. जोहर आपल्या जुळ्या भावासारखे इतके दिसत असत की जेव्हा जेव्हा त्यांचा भाऊ काही खोडकरपणा करून पळून जायचा, तेव्हा वडील आय. एस. जोहर यांनाच शिक्षा देत असत.
जेव्हा त्यांचा भाऊ मोठा झाला तेव्हा तो गैरवर्तन करू लागला आणि त्यामुळे पोलिसांनी त्याला तुरुंगात टाकले. जोहर यांना मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा भावाने सारखे दिसत असल्याचा फायदा उचलला आणि आय. एस. जोहर यांच्या प्रेयसीसोबत लग्न केले. आय. एस. जोहर यांनी स्वतः १९५७ मध्ये आयोजित इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या घटनेचा उल्लेख केला होता. १९४७ मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान आय. एस. जोहर आपल्या कुटुंबासह पटियाला येथे आले. दंगलींमुळे त्यांचे कुटुंब पुन्हा पाकिस्तानला परत जाऊ शकले नाही.
पाच लग्न, पाच घटस्फोट
आय. एस. जोहर यांनी पाच वेळा लग्न केले. पण त्यांचे कोणतेच लग्न फार काळ टिकले नाही. पाच वेळा लग्न केल्यानंतर त्यांचे पाच वेळा घटस्फोटही झाले. अखेर त्यांनी सिनेविश्वात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. १९४९ मध्ये ते सिनेसृष्टीत आपले नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आले. त्यांनी सर्वात आधी सिनेमांसाठी कथा आणि संवादांचे लेखन करण्यास सुरुवात केली. ‘एक थी लडकी’ नावाचा एक सिनेमा होता, ज्याची कथा लिहिण्यासोबतच त्यांनी त्यात एक छोटी विनोदी भूमिकाही साकारली होती.
शेवटची वर्षे
१९८४ मध्ये आय. एस. जोहर यांची प्रकृती खालावली. पाच वेळा लग्न आणि सिनेविश्वातील ओळख असूनही शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत कोणीच नव्हते. पहिल्या पत्नीपासून त्यांना अंबिका आणि अनिल ही दोन मुले होती आणि मुले त्यांच्यासोबत राहत होती. आपल्या निधनाची बातमी कोणाला कळता कामा नये, असे त्यांनी मुलांना सांगितले होते. त्यानंतर बरोबर दोन दिवसांनी, म्हणजे १० मार्च १९८४ रोजी आय. एस. जोहर यांचे निधन झाले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply