बाईकचे इंजिन जास्त गरम होणे ही अनेक वाहनचालकांना भेडसावणारी समस्या आहे. विशेषतः लांबच्या प्रवासात किंवा उन्हाळ्यात ही अडचण अधिक जाणवते. काही साध्या काळजी घेतल्यास इंजिन ओव्हरहीट होण्यापासून बचाव करता येतो.
इंजिन ऑईल वेळेवर तपासा
बाईकच्या इंजिनमधील ऑईल इंजिनचे भाग सुरळीत चालण्यास मदत करते. त्यामुळे वेळोवेळी ऑईलची पातळी तपासणे महत्त्वाचे आहे. ऑईल कमी असल्यास बाईकच्या कंपनीने सांगितलेल्या प्रकारचे ऑईल वापरावे. योग्य ऑईलमुळे इंजिनवरील ताण कमी होतो आणि गरम होण्याची शक्यता घटते.
कूलंटची पातळी नियमित तपासा
ज्या बाईकमध्ये कूलंट सिस्टीम आहे, त्यामध्ये कूलंटची पातळी नियमित तपासणे गरजेचे आहे. कूलंटमुळे इंजिनमधील उष्णता कमी होण्यास मदत होते. कूलंट कमी असल्यास बाईकच्या मॅन्युअलनुसार ते भरावे. तसेच कूलंट गळती दिसल्यास मेकॅनिककडून तपासून घ्यावे.
सतत बाईक चालवणे टाळा
लांबचा प्रवास करताना बाईक सतत अनेक तास चालवण्याऐवजी गरजेनुसार मध्ये थोडा ब्रेक घ्यावा. यामुळे इंजिनला थंड होण्यासाठी वेळ मिळतो आणि ओव्हरहीटिंगचा धोका कमी होतो. ऑईल, कूलंट आणि योग्य विश्रांती या तीन गोष्टींची काळजी घेतल्यास इंजिनचे आयुष्यही वाढते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply