मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला (SIR) निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि नागालँड या सहा राज्यांसाठी आयोगाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. या प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्राची अंतिम यादी कधी
सुधारित वेळापत्रकानुसार महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी ३० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे राज्यातील मतदारांना अंतिम यादीसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दावे-आक्षेपांची मुदतही वाढली
या मुदतवाढीसोबतच दावे आणि आक्षेप नोंदवण्याची मुदतही वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आयोगाने हे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply