दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू लवकरच आई होणार आहे. सातव्या महिन्यातील तिच्या पारंपरिक डोहाळे जेवणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. आता तिचा नववा महिना सुरू असून डिलिव्हरी केव्हाही होऊ शकते, अशा वेळीही ती जिममध्ये कसून व्यायाम करताना दिसत आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती हातात डंबेल घेऊन स्क्वॅट्स मारताना दिसत आहे, ज्यामुळे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
या व्हिडिओमध्ये तिने प्रेग्नेंसीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसांपर्यंतचा फिटनेस प्रवास दाखवला आहे. पहिल्या महिन्यात ती ज्या पद्धतीने व्यायाम करत होती, त्याच प्रकारचा व्यायाम नवव्या महिन्यातही करताना दिसते. हातात डंबेल धरून ती वेटेड स्क्वॅट्स करत आहे. या व्हिडिओला तिने #9 The Final Lap असे कॅप्शन दिले आहे, म्हणजेच आता शेवटचा महिना सुरू आहे, असा त्या कॅप्शनचा अर्थ आहे.
व्यायामाची बदललेली पद्धत
समंथाने याआधीही प्रेग्नेंसी दरम्यानच्या व्यायामाचे काही व्हिडिओ शेअर केले होते. मात्र या काळात तिच्या व्यायामाची पद्धत बदलल्याचेही तिने स्पष्ट केले आहे. आता व्यायाम करताना जास्त मेहनत करण्यापेक्षा शरीर काय सांगते, हे ऐकण्याला महत्त्व देते, असे तिने एका पोस्टमध्ये म्हटले आहे. काही दिवस ती जास्त व्यायाम करते, तर काही दिवस शरीराला आराम देते, असेही तिने सांगितले आहे.
चाहत्यांच्या प्रतिक्रिया
समंथाच्या या व्हिडिओवर अभिनेत्री कृती खरबंदा हिनेही कमेंट केली आहे. तुम्हा तिघानाही खूप प्रेम, अशा शब्दांत तिने समंथा आणि तिच्या कुटुंबाला शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांनी सुपरमॉम म्हणत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सोशल मीडिया यूजर्सनी तिला काळजी घेण्यासाठीही सांगितले आहे, तर काहींनी बेबी बंप बघून समंथाला मुलगा होणार, असा अंदाज बांधला आहे. समंथाने 30 ऑक्टोबर रोजी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply