लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांच्या हप्त्यांची वाट पाहणाऱ्या महिलांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. मात्र यावेळी १५०० रुपये मिळणार की ३००० रुपये मिळणार, याबाबत जो प्रश्न होता, त्यावर आता एक अपडेट समोर आले आहे.
फक्त सप्टेंबरचा हप्ता मिळणार
समोर आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना फक्त सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये, म्हणजे एकाच हप्त्याचे पैसे मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. दोन महिन्यांचे मिळून ३००० रुपये मिळतील, अशी अपेक्षा असलेल्या लाभार्थ्यांना त्यामुळे फक्त एका हप्त्याची रक्कम मिळणार आहे. या पैशातून दिवाळी साजरी करता येईल आणि घरखर्चाला हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
३४४ कोटींचा निधी मंजूर
सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे देण्यासाठी ३४४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागाला हा निधी देण्यास सरकारने बुधवारी परवानगी दिली. सप्टेंबरच्या हप्त्याचे १५०० रुपये देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी या योजनेकडे वळवण्यात आला आहे. अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र महिलांसाठी ३४४.६२ कोटी रुपये इतका निधी प्रशासकीय विभागाचे प्रमुख सचिव, महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यात येणार आहे. सप्टेंबरच्या हप्त्याचे पैसे नेमके कधी खात्यात जमा होणार, याबाबत अद्याप अधिकृत तारीख सांगण्यात आलेली नाही. सरकार लवकरच याची घोषणा करेल, असे सांगितले जात आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply