गोकुळची निवडणूक संपताच प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. निवडणूक प्रचारात सहभागी होण्यासाठी विनापरवाना गैरहजर राहिलेल्या सुमारे ३५० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे गोकुळच्या वर्तुळात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नोटीस का बजावली?
१ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत हे कर्मचारी रजा मंजूर न करून घेताच गैरहजर राहिल्याचे समोर आले आहे. गोकुळच्या निवडणूक प्रचारात सहभागी होण्यासाठी ते गैरहजर राहिले होते. यामध्ये डेअरी आणि पशुखाद्य विभागातील कर्मचाऱ्यांचा मोठ्या संख्येने समावेश आहे.
कामकाजावर परिणाम
कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे संघाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला. ऐनवेळी रोजंदारी कर्मचाऱ्यांकडून काम करून घ्यावे लागले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईचा निर्णय घेतला असून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply