महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सीटू प्रणीत राज्य बांधकाम कामगार संघटनेने सातपूरमध्ये कामगार उपायुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात कामगारांनी विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी केली. आंदोलनानंतर कामगार उपायुक्त विकास माळी यांना निवेदन देण्यात आले.
कामगारांच्या प्रमुख मागण्या
कल्याणकारी योजना पूर्ववत सुरू कराव्यात, शैक्षणिक अर्थसाहाय्य पुन्हा सुरू करावे, ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सोपी करावी आणि नोंदणीकृत कामगारांना आर्थिक मदत द्यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. दिवाळी बोनस अनुदान म्हणून ४० हजार रुपये, मातृत्व लाभापोटी तीन हजार रुपये, मध्यान्ह भोजनासाठी पाच हजार रुपये, घरकुल योजनेअंतर्गत आठ लाख रुपयांचे साहाय्य द्यावे आणि मेडिक्लेम योजना पूर्ववत सुरू करावी, अशीही मागणी करण्यात आली.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मुंबई व दिल्लीत विराट मोर्चे
डॉ. डी. एल. कराड यांनी सांगितले की, बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात मुंबई व दिल्ली येथे विराट मोर्चे काढण्याचे नियोजन आहे. या आंदोलनांमध्ये कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष, चिटणीस आणि जनरल सेक्रेटरी यांच्यासह मोठ्या संख्येने बांधकाम कामगार उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply