शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

हिंगोलीत भाजीपाल्याचे दर आठवडाभरात दुप्पट

हिंगोली जिल्ह्यात अत्यल्प पावसामुळे भाजीपाला उत्पादन घटले असून मंडईतील आवक निम्म्यावर आली आहे. परिणामी आठवडाभरात अनेक भाज्यांचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत.

हिंगोलीत भाजीपाल्याचे दर आठवडाभरात दुप्पट

हिंगोली जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याने भाजीपाला उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. पाण्याअभावी शेतातील भाजीपाला करपून जात असून आठवडाभरात भाजीमंडईतील आवक निम्म्यावर आली आहे. परिणामी भाजीपाल्याच्या दरांत वाढ झाली असून शेवग्याच्या शेंगांचे दर प्रतिकिलो १५० ते १६० रुपयांवर पोहोचले आहेत. मिरची, टोमॅटो, सिमला मिरची, कारले आणि गाजराच्या दरांनीही शंभरी ओलांडली आहे.

पावसाची तूट आणि भूजल पातळीत घट

जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत अवघा ६९.९ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत पावसात सुमारे ३० टक्क्यांची तूट निर्माण झाली आहे. याचा परिणाम भूजल पातळीवरही झाला असून भूजल पातळीत २.८४ मीटरने घट नोंदविण्यात आली आहे. विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खालावल्याने अनेक भागांत आतापासूनच पाणीटंचाईचे संकट जाणवू लागले आहे. कूपनलिका कोरड्या पडू लागल्याने हळद, कापूस आणि तूर या पिकांसह भाजीपाला उत्पादक शेतकरीही अडचणीत सापडले आहेत. एकीकडे पिके हातची जाण्याची भीती निर्माण झाली असताना दुसरीकडे भाजीपाला पिकालाही फटका बसू लागला आहे. पाण्याअभावी भाजीपाला शेतातच करपून जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उत्पादनावर परिणाम झाल्याने मंडईत आवक मंदावली आहे.

आठवडाभरात दर कसे बदलले

हिंगोली शहरातील जवाहर रोड परिसरातील मुख्य भाजीमंडईत गत महिन्याच्या तुलनेत सध्या भाजीपाल्याची आवक निम्म्यावर आली आहे. पाण्याअभावी भाजीपाला उत्पादन घटल्याने बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत आहे. परिणामी आठवडाभरात अनेक भाज्यांचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. शेवग्याच्या शेंगांसाठी ग्राहकांना प्रतिकिलो १५० ते १६० रुपये मोजावे लागत आहेत. मिरची आणि टोमॅटोसह अन्य भाज्यांचे दरही वाढल्याने रोजच्या स्वयंपाकाचा खर्च वाढला आहे. गत आठवड्याच्या तुलनेत टोमॅटो ८० रुपयांवरून १२० रुपये, फुलकोबी ७० रुपयांवरून १०० रुपये, मिरची १०० रुपयांवरून १२० रुपये, गाजर ५० रुपयांवरून ८० रुपये, शेवगा १२० रुपयांवरून १६० रुपये, शिमला मिरची ७० रुपयांवरून १२० रुपये, कारले ८० रुपयांवरून १२० रुपये आणि कोथिंबीर ८० रुपयांवरून १२० रुपये प्रतिकिलो झाली आहे. भाजीमंडईत पंधरा दिवसांपासून आवक मंदावली असून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांकडून भाजीपाला विक्रीसाठी येत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. येणाऱ्या दिवसांतही आवक वाढण्याची शक्यता कमीच असून आणखी भाववाढीची शक्यता आहे. तर यंदा अत्यल्प पावसामुळे खरीप पिके हातची गेली असून विहीर आणि बोअरवर भाजीपाला जगविणेही शक्य होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

स्रोत: मूळ बातमी

प्राची शिंदे

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance