शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी; नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी; नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश

धोंडेगाव, देवरगाव (ता. नाशिक) येथे आमदार सरोज अहिरे आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज सकाळी दुष्काळी परिस्थितीची व नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीची माहिती घेतली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने पंचनामे पूर्ण करावेत. तसेच, पंचनाम्यांच्या आधारे शासनाच्या प्रचलित नियम व निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या पाहणीप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे, तहसीलदार पंकज पवार, नुकसानग्रस्त शेतकरी आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार अहिरे आणि जिल्हाधिकारी प्रसाद यांनी शेतातील पिकांच्या नुकसानीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली. नुकसानग्रस्त क्षेत्राचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून पंचनाम्यांची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार मदत मिळण्यासाठी महसूल व कृषी विभागाने समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. पंचनामे वेळेत पूर्ण करून नुकसानीची अचूक नोंद घेण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance