भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना जवळ येत असताना टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. स्टार सलामीवीर ईशान किशन दुसऱ्या सामन्यातून बाहेर झाला आहे. याबद्दलची अधिकृत माहिती बीसीसीआयने दिली आहे.
ईशान किशनला दुखापत
पहिल्या सामन्यात खेळताना ईशान किशनच्या उजव्या मांडीच्या स्नायुंना दुखापत झाली. त्यामुळे तो दुसरा सामना खेळू शकणार नाही. निवड समितीने त्याच्या जागी पर्याय म्हणून कुमार कुशाग्रला संघात स्थान दिलं आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम सध्या ईशान किशनवर लक्ष ठेवून असून तो लवकर बरा होईल अशी अपेक्षा आहे.
वैभव सूर्यवंशीलाही संधी?
कुमार कुशाग्र सध्या न्यूझीलंडमध्येच क्राइस्टचर्च येथे इंडिया ए संघासोबत आहे. त्याला आता भारतीय टी-20 संघात पर्यायी खेळाडू म्हणून स्थान मिळालं आहे. मात्र, दुसऱ्या सामन्यात अंतिम अकरामध्ये त्याला संधी मिळणार का, हे अद्याप स्पष्ट नाही. दरम्यान, प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी वैभव सूर्यवंशीला दुसऱ्या टी-20 मध्ये संधी मिळू शकते असे संकेत दिले आहेत. कर्णधार श्रेयस अय्यर कोणत्या खेळाडूंना संधी देतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply