मेळघाटात प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाला विरोध वाढत चालला आहे. युवक काँग्रेसने या प्रकल्पाविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
गावागावात जनजागृती मोहीम
युवक काँग्रेस गावागावात कॉर्नर बैठका घेऊन आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करणार आहे. प्रकल्पाचे संभाव्य परिणाम समजावून सांगितले जाणार आहेत. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी कामापूर गावात जाऊन स्थानिक आदिवासी बांधवांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी प्रकल्पाबाबत चिंता व्यक्त केली.
न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार
राहुल येवले यांनी हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ दिला जाणार नाही, असे स्पष्ट केले. प्रकल्पासाठी होणारी वृक्षतोड पूर्णपणे थांबवली जाईल, असेही त्यांनी सांगितले. युवक काँग्रेस आणि स्थानिक आदिवासी बांधव या विरोधात न्यायालयीन लढाई लढण्यासाठी तयार आहेत. मेळघाटाचे नैसर्गिक वैभव आणि आदिवासींचे हक्क जपण्यासाठी हे आंदोलन तीव्र केले जाणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा