छत्रपती संभाजीनगर शहरात अन्न व औषध प्रशासनाने अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या १२ विविध आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
तपासणीत काय आढळले
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाने शहरातील विविध भागांमध्ये तपासणी मोहीम राबवली. या तपासणीदरम्यान अनेक आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आढळून आली. तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघनही होत असल्याचे निदर्शनास आले. या गंभीर अनियमितता लक्षात घेऊन प्रशासनाने संबंधित १२ आस्थापनांवर थेट परवाना निलंबनाची कारवाई केली. ज्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यामध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, मिठाईची दुकाने, डेअरी उत्पादनांची दुकाने आणि ब्लिंकइट स्टोअर्सचाही समावेश आहे.
व्यावसायिकांना कडक इशारा
या कारवाईमुळे अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या सर्व व्यावसायिकांना अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचा इशारा मिळाला आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा