अहिल्यानगर शहरातील प्रतिष्ठित नगर क्लबच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सर्व 11 जागांवरील निवड बिनविरोध झाली आहे. उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांची क्लबच्या सचिवपदी पाचव्यांदा निवड झाली. सचिवपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
चार जणांनी माघार घेतली
नगर क्लबच्या संचालक मंडळाच्या 11 जागांसाठी एकूण 15 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत विनीत ओबेराय, प्रवीण कटारिया, योगेश मालपाणी आणि दिलीप बोरा या चौघांनी माघार घेतली. त्यामुळे सर्व 11 जागांसाठी निवडणूक बिनविरोध झाली. बिनविरोध निवड झालेल्या संचालकांमध्ये सुमतीलाल कोठारी, सीए अशोक पितळे, चेतन बोगावत, नीलेश चोपडा, अॅड. जयवंत भापकर, पवन गांधी, सत्येन गुंदेचा, डॉ. रवींद्र सोमाणी, आजेशकुमार धुप्पड, राहुल मुनोत आणि सीए नितीन पोखर्णा यांचा समावेश आहे.
क्लबची रचना आणि निवडणूक प्रक्रिया
नगर क्लबचे एकूण 1,750 सभासद असून दर तीन वर्षांनी संस्थेची निवडणूक होते. जिल्हाधिकारी हे क्लबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, तर सचिव आणि संचालकांची निवडणुकीद्वारे निवड केली जाते. 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. या निवडणुकीसाठी सीए अमित फिरोदिया आणि अॅड. समीर सोनी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
प्रतिक्रिया व्यक्त करा