सध्या टीम इंडियाचा युवा स्टार क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी धावांचा पाऊस पाडतोय. एका बाजूने तो दमदार बॅटिंग करतोय. वैभवच्या बॅटिंगची सर्वत्र चर्चा सुरू आहे. वैभवने आपल्या फलंदाजीने समोरच्या टीमवर दहशत निर्माण केली आहे. मंगळवारी यूएई अ विरुद्ध त्याने अवघ्या ५३ चेंडूत २०४ धावा ठोकल्या. त्याने आपल्या खेळीत २८ षटकार आणि सात चौकार मारले. २९ चेंडूत त्याने शतक पूर्ण केले, ४० चेंडूत १५० धावा आणि ५२ चेंडूत द्विशतक झळकवले.
पुरुषांच्या लिस्ट ए क्रिकेटमध्ये विक्रम
या कामगिरीनंतर वैभव सूर्यवंशी पुरुषांच्या लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक आणि द्विशतक झळकवणारा खेळाडू बनला आहे. वैभवच्या या ऐतिहासिक खेळीच्या बळावर भारत अ संघाने अवघ्या १४.२ षटकांत तीन विकेट गमावून सामना जिंकला. अवघ्या १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी विक्रमी खेळी खेळतोय. सामन्याबद्दल बोलताना वैभव म्हणाला, सुरुवातीला खेळपट्टी आणि परिस्थिती कशी आहे हे समजून घेण्याचा त्याने प्रयत्न केला. मागच्या दोन सामन्यांत चांगल्या सुरुवातीला तो मोठ्या खेळीमध्ये बदलू शकला नव्हता. म्हणून या सामन्यात सुरुवातीला त्याने थोडा वेळ घेतला.
पीटरसनची मोठी भविष्यवाणी
इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनही वैभव सूर्यवंशीच्या खेळाच्या प्रेमात पडला आहे. पीटरसनने वैभव सूर्यवंशीच्या खेळाबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली आहे. क्रिकेट विश्वाचे लक्ष वैभवने वेधून घेतले आहे. पीटरसनच्या मते, वैभव पुढच्या पाच वर्षांत टेस्ट क्रिकेटमध्ये एका सामन्यात ५०० धावा ठोकेल. पीटरसनने गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या संदर्भात पोस्ट केली. एसीसी पुरुष आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत यूएई अ विरुद्धच्या एका सामन्यात वैभव ऐतिहासिक खेळी खेळला. त्यानंतर पीटरसनने ही पोस्ट केली.
प्रतिक्रिया व्यक्त करा