कर्मचाऱ्यांना आपले पीएफचे पैसे काढण्याची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी ईपीएफओ वेळोवेळी आपल्या नियमांत बदल करते. आता ईपीएफओ मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा फायदा देशातील लाखो कर्मचाऱ्यांना होणार आहे.
सुरुवातीला एक हजार रुपयांची मर्यादा
मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत यूपीआयच्या मदतीने पीएफ काढण्याची सुविधा सुरू केली जाऊ शकते. सुरुवातीच्या काळात यूपीआयच्या मदतीने पैसे काढण्याची मर्यादा एक हजार रुपये ठेवली जाऊ शकते. छोटी रक्कम क्लेम करणाऱ्यांचा त्रास कमी व्हावा हा यामागचा उद्देश आहे. बिझनेस स्टँडर्डने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सी-डॅककडे प्रणाली तयार करण्याची जबाबदारी
ही प्रणाली सुरू करण्यासाठी चाचणी केली जात आहे. त्यासाठीच्या दोन चाचणी फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या चाचणीदरम्यान काही अडचणी आल्या होत्या. त्या दूर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पीएफचे पैसे यूपीआयच्या माध्यमातून काढण्याच्या योजनेवर अधिकृतरित्या २८ मार्च २०२५ रोजी चर्चा झाली होती. २९ मार्च २०२५ रोजी केंद्र सरकारने याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी करून माहिती दिली होती. कर्मचाऱ्यांना आपले पीएफचे पैसे यूपीआयच्या माध्यमातून काढता यावेत यासाठी प्रणाली तयार करण्याची जबाबदारी टेक्नोलॉजी पार्टनर सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कम्प्यूटिंग (सी-डॅक) कडे सोपवण्यात आलेली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा