Vivo ने भारतात आपली नवीन X500 मालिका लाँच केली आहे. या मालिकेत Vivo X500, Vivo X500 Pro आणि Vivo X500 Pro Max असे तीन प्रीमियम स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. तिन्ही फोनमध्ये कॅमेरा आणि परफॉर्मन्सवर विशेष भर देण्यात आला आहे. भारतात पहिल्यांदाच Vivo X मालिकेत Pro Max मॉडेल सादर करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रीमियम स्मार्टफोन खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी ही मालिका महत्त्वाची ठरू शकते.
किंमत आणि व्हेरिएंट
तिन्ही स्मार्टफोन वेगवेगळ्या किंमतींमध्ये बाजारात आणले आहेत. या मालिकेची सुरुवात 1,19,999 रुपयांपासून होते. Vivo X500 चा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 1,19,999 रुपयांना मिळेल. Vivo X500 Pro चा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 1,49,999 रुपयांना आहे. Vivo X500 Pro Max चे दोन व्हेरिएंट आहेत. 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 1,64,999 रुपयांना, तर 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 1,79,999 रुपयांना मिळेल.
बेस मॉडेल असलेल्या Vivo X500 मध्येही प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. या फोनमध्ये 6.59 इंचांचा 1.5K AMOLED डिस्प्ले असून तो 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. त्यामुळे गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्याचा अनुभव अधिक स्मूद होतो. परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये 3nm तंत्रज्ञानावर आधारित MediaTek Dimensity 9600M प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात 50MP प्रायमरी कॅमेरा, 50MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 64MP पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा मिळतो. याशिवाय 100x डिजिटल झूम आणि 8K रिझोल्यूशनमध्ये 30fps व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधाही आहे. बॅटरीच्या बाबतीतही हा फोन मागे नाही. यात 7,500mAh बॅटरी असून 90W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.
कॅमेरा आणि बॅटरी
Pro आणि Pro Max मॉडेल्समध्ये फोटोग्राफीसाठी विशेष फीचर्स देण्यात आले आहेत. Vivo X500 Pro Max मध्ये झाइसच्या सहकार्याने तयार केलेला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा, 50MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि तब्बल 200MP झाइस APO टेलिफोटो कॅमेरा आहे. त्यामुळे हा फोन कॅमेरा प्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकतो. दुसरीकडे Vivo X500 Pro मध्ये 50MP प्रायमरी, 50MP अल्ट्रावाइड आणि 64MP टेलिफोटो कॅमेरा मिळतो. दोन्ही मॉडेल्समध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 4K रिझोल्यूशनमध्ये 240fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते.
बॅटरीच्या बाबतीतही दोन्ही मॉडेल्समध्ये फरक आहे. Vivo X500 Pro Max मध्ये 7,800mAh बॅटरी मिळते, तर Vivo X500 Pro मध्ये 6,510mAh बॅटरी देण्यात आली आहे. दोन्ही फोन 90W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतात. विशेष म्हणजे या स्मार्टफोनना IP68 आणि IP69 रेटिंग मिळालं आहे. त्यामुळे धूळ आणि पाण्यापासून संरक्षण मिळण्यास मदत होते.
प्रतिक्रिया व्यक्त करा