लग्नसराईची लगबग सुरू झाली असतानाच सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सर्वसामान्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे. आज, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी जळगावच्या सराफा बाजारात पुन्हा सोन्याचा भाव ३५०० रुपयांनी, तर चांदीचा भाव तब्बल ८००० रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे दागिने खरेदी करणं सर्वसामान्यांसाठी सोपं झालं आहे.
आजचे सोन्या-चांदीचे दर
आज सराफा बाजारातील सोन्याचा भाव १,२३,००० रुपये आहे. यामध्ये ३५०० रुपयांनी घसरण झाली आहे. तर चांदीचा आजचा भाव १,४९,००० रुपये आहे. यामध्ये तब्बल ८,००० रुपयांनी घसरण झालेली आहे. ही घसरण आणखी वाढत राहील की कमी होईल, याकडे सर्व ग्राहकांचं लक्ष लागलं आहे. दिवाळीच्या दिवसांमध्येही सोन्याच्या किंमतीत घसरण झाली होती. तेव्हा नागरिकांनी सोनं-चांदी खरेदी करणं पसंत केलं होतं.
मुंबई-पुण्यातील आजचे दर
मुंबई-पुण्यात आज २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव १२,४५८ रुपये आहे. २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ११,४२० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ९,३४४ रुपये इतका आहे. तर १ ग्रॅम चांदी १६५ रुपये असून १ किलो चांदीचा भाव १,६५,००० रुपये इतका आहे. २४ कॅरेट १ तोळा सोन्याचा भाव १,२४,५८० रुपये, २२ कॅरेट १ तोळा सोन्याचा भाव १,१४,२०० रुपये आणि १८ कॅरेट १ तोळा सोन्याचा भाव ९३,४४० रुपये इतका आहे.
सध्या ग्राहक सोनं-चांदीच्या किंमतीत आणखी घसरण होण्याची वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांची घसरण पाहता ग्राहक सोनं-चांदी खरेदी करणं पसंत करत आहेत. पुढे आणखी घसरण होईल, अशी शक्यता आहे.
Leave a Reply