बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

पुणे महापालिकेचा विद्रूपीकरण पुरस्कार भाजपच्याच भीमालेंना

पुणे महापालिकेची विद्रूपीकरण पुरस्कार मोहीम सुरू. पहिला पुरस्कार भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांना जाहीर; सर्वाधिक अनधिकृत फ्लेक्स त्यांचे आढळले.

पुणे महापालिकेचा विद्रूपीकरण पुरस्कार भाजपच्याच भीमालेंना

पुणे महापालिकेने ‘भाऊ फ्लेक्स काढा’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जे लोकप्रतिनिधी फ्लेक्स लावून शहराचे विद्रूपीकरण करत आहेत, त्यांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या मोहिमेचा पहिला पुरस्कार सत्ताधारी भाजपाच्याच नगरसेवकाला मिळाला आहे.

## स्थायी समिती अध्यक्षांनाच पुरस्कार

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी थेट स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांनाच शहर विद्रूपीकरणाचा पुरस्कार जाहीर केला आहे. शहरातील विकास कामांना मान्यता स्थायी समितीकडूनच दिली जाते. शहराच्या विकासाची मोठी जबाबदारी स्थायी समितीवर असते. त्याशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही. त्यामुळे स्थायी समितीचे अध्यक्ष हे महापालिकेतील मोठ्या पदांपैकी एक मानले जाते. मात्र पुण्यात स्थायी समितीच्या अध्यक्षांकडूनच शहराचे विद्रूपीकरण होत असल्याचे समोर आले आहे.

शहरात सर्वाधिक अनधिकृत फ्लेक्स हे भीमाले यांचेच आढळले आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पृथ्वीराज सुतार, तर तिसऱ्या क्रमांकावर सुनील पांडे यांचे नाव आहे. या मोहिमेत कोणाचीही गय केली जाणार नाही, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

## वाढदिवसाच्या दिवशीच अनोखे गिफ्ट

आज श्रीनाथ भीमाले यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने शहरात त्यांचे बॅनर झळकले आहेत. आयुक्तांनी वाढदिवसाच्या दिवशीच हा अनोखा पुरस्कार जाहीर करत भीमाले यांना वेगळेच गिफ्ट दिले आहे. शहराचे विद्रूपीकरण टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून मोठी पावले उचलली जात आहेत. त्यातच आता या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance